रांची ची राजकुमारी आणि मिसेस इंडिया रिंकू भगत ने चीन मध्ये आयोजित मिसेस आशिया इंटरनॅशनल मध्ये भारताचे नाव मोठे केले आहे. रिंकू भगत ने अंतिम फेरीमध्ये मिसेस आशिया इंटरनॅशनल पॉप्युलरीटी क्राऊन जिंकला. ज्यानंतर मलेशियाची महाराणीने रिंकू ला हा मुकुट घातला. रिंकू चे म्हणणे आहे कि लोकांचे प्रेम आणि स्नेह ह्यांच्या जोरावर त्यांनी ये यश प्राप्त केले आहे. चीन मधील शांघाय येथे 24 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर पर्यंत ह्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ज्यात आशिया खंडातील 40 वेगवेगळ्या देशातील प्रतिनिधींनी भाग घेतला होता. रांची येथील रिंकूने ह्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तिने ह्या स्पर्धेत निसेस आशिया इंटरनॅशनल हा खिताब जिंकण्यात यश मिळवले आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews